खोपोली | (साबीर शेख) :-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)चे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या निवासस्थानी झालेल्या कथित शाईफेक प्रकरणावरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. प्रियंका गाडे यांनी कायदा हातात घेत केलेल्या गंभीर घटनेनंतर गायकवाड कुटुंबीयांना मानसिक व सामाजिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने या घटनेचा रायगड जिल्ह्यातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम रिपाई नेते नरेंद्र गायकवाड यांनी खोपोली येथील महाराजा मंगल कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत जवाबदार पदाधिकारी व गायकवाड परिवारातील कुटुंब प्रमुख म्हणून भूमिका स्पष्ट केली.गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार, राजकीय वैमनस्यातून तसेच डॉ. सोनवणे यांना पाठिंबा देत मदत केल्याच्या कारणावरून आपल्याविरोधात वैयक्तिक आरोप करण्यात आले असून हे आरोप खोटे व तथ्यहीन असल्याचा दावा त्यांनी केला. वादविवाद, भांडण, शांतता भंग करून नासधूस डोळ्यात शाई फेकीच्या घटनेनंतर घरातील व सोसायटीतील रहिवासी तसेच आपल्या पत्नी आणि नुकत्याच गंभीर आजारातून सावरलेल्या ज्येष्ठ कन्येलाही मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे मत त्यांनी पत्रकार परिषदेत मांडले. गायकवाड यांनी निंदनीय घटनेची माहिती देत आरोप केला की, गाडे या महिलेनी पक्षाचे नाव व पदाचा गैरवापर करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, यामागे राजकीय हेतूने वैयक्तिक इर्षेतून हा कटकारस्थान रचला जात असावा असा संशय व्यक्त केला . या गुन्ह्या सोबत मागील त्यांच्या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी पोलीस तपासात करावी, माझ्या सह पक्ष समर्थक कुटुंब सदस्यांच्या जीवितास धोका असल्याने आवश्यक सुरक्षा मिळावी, असे सांगण्यात आले.दरम्यान, गायकवाड यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांनी याबाबत दोषींवर कठोर कारवाई व्हावी हि घटना राजकीय संस्कृतीला शोभणारी बाब नसल्याचे मत व्यक्त केल्याचे बोलले जात आहे . या प्रकरणात प्रशासना कडून तात्काळ समाधानकारक कारवाई न झाल्यास रिपाई पक्षाच्या स्टाईलने विरोधकांना उत्तर देऊ असा इशाराही महिला पदाधिकाऱ्यांनी रोष व्यक्त करीत दिला.
दुसरीकडे, या वादाच्या केंद्र स्थानी असलेले डॉ. सचिन सोनवणे यांनी प्रियांका गाडे यांच्या सहकाऱ्यांकडून दबाव निर्माण करून खंडणीसाठी प्रयत्न झाल्याचा कथित आरोप करीत पोलिसांकडे निवेदन दिल्याचे सांगण्यात आले. गाडे यांच्यावर नांदेड येथे काही गंभीर गुन्हे असल्याची नोंद असून त्यांची संपुर्ण पार्श्वभूमी तपासून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.पुढील काळात या सर्व आरोप-प्रत्यारोपा मागील सत्य पोलीस तपासातूनच स्पष्ट होणार असून दरम्यान, राजकीय पदाधिकाऱ्यांच्या कुटुंब सुरक्षेचा प्रश्नही या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे.तात्काळ पोलीस प्रशानाने संरक्षण म्हणून नरेंद्र गायकवाड यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक मावळलोकसभा मतदार संघ अध्यक्ष चिंतामणी सोनवणे, शहर प्रमुख नितीन वाघमारे,तालुका अध्यक्ष सूर्यकांत कांबळे,जिल्हा संघटक गोपीनाथ सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष अशोक गोतरने, सुशांत भवर, खालापूर तालुका महिला अध्यक्षा पूनम सानस ,कर्जत शहर महिला आघाडी अध्यक्ष वैशाली भोसले, खोपोली शहर अध्यक्ष प्रमिला कदम, शहर युवक अध्यक्ष रुपेश रुपवते ,नरेश जाधव,संदीप गायकवाड ,संतोष केदारी , खालापूर तालुका प्रसिद्धीप्रमुख जतीन मोरे,दिनेश गायकवाड यांच्या सह पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Comments