विमानतळ बाधित २७ गाव समितीत फूट; सत्ताधाऱ्यांवर दबाव, गुंडगिरीचे आरोप

पनवेल/प्रतिनिधी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प सुरू होताच स्थापन झालेल्या विमानतळ प्रकल्प बाधित दहागाव समितीच्या गती मंदावल्याने, प्रकल्पग्रस्तांनी विमानतळाच्या पलीकडील गावे समाविष्ट करून २७ गावांची समिती उभी केली होती. दोन वर्षे सुरळीत चाललेल्या या समितीत अलीकडे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या बाबतीत वाढता राजकीय हस्तक्षेप होत असल्याने वातावरण तापले.अखेरीस, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, सहसचिव प्रवक्ते आणि अनेक सदस्यांनी सामूहिक राजीनाम्यांचा बॉम्ब टाकत, पुढील काळात अराजकीय लढ्याचा बिगुल वाजवला.राजीनामा देताना सदस्यांनी प्रस्थापित आणि सत्ताधारी नेत्यांकडून विमानतळ कंपन्यांवर प्रचंड दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप केला. इतकेच नव्हे, तर विद्यमान लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते गुंडगिरीची भाषा, राजकीय दबाव आणि दडपशाहीचे तंत्र वापरत असल्याचे त्यांनी उघडपणे सांगितले.याबाबत लवकरच अन्यायाला वाचा फोडण्या साठी ठोस निर्णय घेतला जाईल असे प्रकल्प ग्रस्तानी प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली.

Post a Comment

0 Comments