शेकाप महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा व  सामाजिक कार्यकर्त्या दिक्षा जाधव यांचा भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश

पनवेल (प्रतिनिधी):पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तळोजा फेज-२ येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि शेकाप महिला आघाडीच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षा दिक्षाताई दिलीप जाधव यांनी शेकडो महिला व पुरुष कार्यकर्त्याच्या फौजेसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश कार्यक्रम अत्यंत उत्साहात, जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला असून शेतकरी कामगार पक्षाला आणखी एक मोठा हादरा बसला आहे. त्यामुळे तळोजा व पनवेल परिसरातील राजकीय वर्तुळात याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा तळोजा फेज २ येथे पार पडला. यावेळी महंत जितेंद्र महाराज, विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, वासुदेव घरत, वसंतराव नाईक, भाजपचे पूर्व मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, नंदकुमार म्हात्रे, माजी सरपंच नितीन भोईर, छगन राठोड, उमेश कुंभार, हरेश पवार,अशोक शेडगे, विजय मालवे, सुधीर राठोड, अरुण राठोड, अशोक वीरकर, रुपेश चव्हाण, सुनील गाडेकर यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमात मान्यवरांनी दिक्षाताई दिलीप जाधव यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करत त्यांच्या सामाजिक कार्याचा विशेष उल्लेख केला. दिक्षाताई जाधव यांनी गेल्या अनेक वर्षांपासून तळोजा फेज-२ परिसरात सामाजिक, शैक्षणिक व नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने कार्य केले असून त्यांच्या कार्याची दखल घेत भाजपने त्यांचे स्वागत केल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.याप्रसंगी बोलताना दिक्षा फाऊंडेशनच्या अध्यक्षा दिक्षाताई दिलीप जाधव यांनी सांगितले की, तळोजा व पनवेल परिसरात होत असलेल्या विकासकामांमुळे प्रेरित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. समाजकारण व विकासाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी भाजपच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करेन, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या पक्षप्रवेशामुळे तळोजा परिसरात भाजपची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असून आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकांमध्ये याचा निश्चित सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

कोट - जगातील सर्वाधिक सदस्यसंख्या असलेला भारतीय जनता पक्ष हा देशाच्या विकासाचा मजबूत आधारस्तंभ आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देश व राज्याने झपाट्याने विकासाची वाटचाल केली आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे घोषवाक्य केवळ शब्दांत न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरले आहे. विविध लोककल्याणकारी योजना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीच्या काळात ज्या विकासापासून जनता वंचित राहिली होती, तो विकास आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा गतिमान झाला आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे राज्याने विकासाची नवी उंची गाठली आहे. अशा विकासाभिमुख विचारधारेत सहभागी झाल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. तुम्हाला पक्षात सन्मान आणि काम करण्याची योग्य संधी देण्यात येईल. - आमदार प्रशांत ठाकूर 


Post a Comment

0 Comments