प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजप महायुतीची भव्य प्रचार रॅली; मतदार नागरिकांचा भाजप महायुतीला वाढता पाठिंबा

पनवेल (प्रतिनिधी):निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक २ मध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीच्या उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत प्रचाराचा भव्य शुभारंभ केला. भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रचार पनवेल महानगरपालिका हद्दीत सुरू झाला. मतदार नागरिकांचा भाजप महायुतीला वाढता पाठिंबा मिळाल्याने या ठिकाणी महायुतीचे उमेदवार मोठ्या मतांनी विजयी होतील, असे चित्र आहे.  
या प्रभागातून महायुतीने काजल पाटील, अरुणा दाभणे, दिनेश खानावकर आणि कृष्णा पाटील या चार उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी उमेदवारांनी प्रभागातील प्रमुख भागांतून भव्य रॅली काढली. या रॅलीच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधत गाठीभेटींवर भर देण्यात आला.प्रचारादरम्यान अरुणशेठ भगत यांनी सांगितले की, महापालिकेच्या स्थापनेपासून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचा ठोस अजेंडा राबविण्यात आला आहे. हाच विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून महायुती मतदारांसमोर जात आहे. आतापर्यंत केलेल्या कामांमुळे जनतेचा महायुतीवर पूर्ण विश्वास असून, प्रभाग क्रमांक २ मधील मतदार भाजपच्या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या वेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments