पनवेल (प्रतिनिधी) गोरगरिबांचे आधारवड, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने शनिवार दिनांक २३ ऑगस्ट आणि रविवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी पनवेलमध्ये 'रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा' आयोजित करण्यात आली आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने भजन परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात होणारी हि स्पर्धा 'पुरुष खुला गट' आणि 'महिला खुला गट' अशा दोन गटात होणार असून प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट आहे. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक ५१ हजार रुपये, द्वितीय क्रमांक २५ हजार रुपये, तृतीय क्रमांकास १५ हजार रुपये, उत्तेजनार्थ पारितोषिक ७ हजार रुपये, तसेच उत्कृष्ट पखवाज वादक व उत्कृष्ट तबला वादक यांना प्रत्येकी ७ हजार रुपये आणि सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याकरीता व अधिक माहितीसाठी सागर राजे - ९२२४३४४१३६, नारायण बुवा पाटील- ७७१५८३५४२४, उमेश बुवा चौधरी - ९३२४८२४२०५, चंद्रकांत मने ९७६८६५६४८४, विनोद तोडेकर ७०४५८२२५४८, जगदीश म्हात्रे - ९३२६८१२१९६, पुनमताई ठाकूर ७२०८७७६००५, अभिषेक पटवर्धन - ९०२९५८०३४३, पवन राजे - ९२२१०९७३३७, अनिल कोळी - ९१६७४७४५०७, मच्छिंद्र पाटील - ९००४०४८६३० किंवा डॉ. शैलेश वाजेकर ९८६७२९६८५० यांच्याशी संपर्क साधावा तसेच रायगडमधील सर्व भजनी मंडळांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
0 Comments