प्रतिनिधी/उरण : प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी मिलिंद पाडगावकर, श्रद्धा ठाकूर यांची नुकतीच दिल्लीतून निवड करण्यात आली. त्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते टिळक भवन येथे सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी काँग्रेसचे कट्टर व एकनिष्ठ प्रामाणिक कार्यकर्ते मिलिंद पाडगावकर, श्रद्धा ठाकूर यांची नुकतीच निवड झाल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0 Comments