पनवेल/ प्रतिनिधी :कामोठे सेक्टर 35 येथील प्रतीक जेम्स सोसायटी मध्ये सोन्याची चोरी झाल्याची घटना उघडकीस आलेली असून या संदर्भात पीडित चेतन विलास म्हसकर यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.पर्ल – 1304 या फ्लॅटमधून सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचा दावा म्हसकर यांनी केला असून, या संदर्भातील तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. चोरी झाल्यानंतर घटनास्थळी करण्यात आलेल्या तपासामध्ये CCTV फुटेज, पुरावे आणि इतर बाबींची छाननी सुरू असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.या घटनेमुळे आमच्या कुटुंबावर मोठा मानसिक व आर्थिक आघात झाला आहे. या घटनेची सत्यता समाजासमोर यावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी हीच आमची अपेक्षा, असे मत म्हसकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. या प्रकरणात अद्याप संशयितांची ओळख स्पष्ट झाली नसून, पोलीस सर्व बाबींचा तपास करत आहेत. माध्यमांनी वस्तुनिष्ठ माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.
0 Comments