शिक्षण क्षेत्रातील योगदानाची घेतली दखल शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, आत्मविश्वास, सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण आणि जीवनमूल्यांची रुजवण करणारे असावे, या विचारातून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था सातत्याने कार्यरत आहे. शैक्षणिक क्षेत्रात संस्थेने उभारलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि संस्थात्मक कार्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांतील विद्यार्थ्यांना प्रगतीची संधी उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या ध्येयधोरणातून संस्थेच्या शैक्षणिक कार्याला दिशा मिळाली आहे. याच कार्याची माहिती घेत शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची पाहणी केली आणि शाळेतील शैक्षणिक सुविधांची माहिती जाणून घेतली.यावेळी मंत्री दादाजी भुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक वाटचालीची माहिती घेतली.यावेळी नगरसेवक प्रवीण पाटील, शत्रुघ्न काकडे, मधु पाटील, नरेश ठाकूर, अनिता पाटील, परेश पटेल, भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, संस्थेचे संचालक संजय भगत, राहुल घरत, स्वप्निल ठाकूर, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्या राज अलोनी, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. पाटील यांच्यासह संस्थेचे पदाधिकारीही उपस्थित होते.
0 Comments