गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक आणि भाविक शहरात दाखल होत असल्याने विविध ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या.गणेश विसर्जनाच्या दिवशी नागरिकांना वाहतुकीचा त्रास होऊ नये, यासाठी प्रत्यक्ष रस्त्यांवरील नियोजनासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. वाहतुकीतील बदल आणि मार्गांबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. आगमनापासून विसर्जनापर्यंत करण्यात आलेल्या या नियोजनामुळे गणेशोत्सव काळातील वाहतूक व्यवस्थापनास मदत झाली असून, पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांच्या कामाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
0 Comments