उरण, पनवेल तालुक्यांतील साखरचौथ गणपतींचे महेंद्रशेठ घरत यांनी घेतले दर्शन!

 उलवे, ता. १ : रायगड जिल्ह्यात आगरी समाजात साखरचौथ गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या पहिल्या संकष्टीला (साखरचौथ) गणरायाचे विराजमान घरी होते. या गणपतीला खोबरे आणि साखरेचे सारण असलेल्या मोदकांचा नैवेद्य दाखवतात. सर्व गोड पदार्थ साखरेचेच बनवतात म्हणूनच 'साखरचौथ गणेशोत्सव' म्हटले जाते.
त्यामुळे गणेशाचे निस्सीम भक्त असलेले आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी उरण, पनवेल तालुक्यांतील अनेक गावांत जाऊन साखरचौथ, गौरा गणपतींचे दर्शन मंगळवारी आणि बुधवारी घेतले.खारकोपर, गव्हाण, जासई, रांजणपाडा, केगाव, उरण, पागोटे, बोकडविरा, खोपटे, कोप्रोली, पाणदिवे, भोम, मोठी जुई, चिरनेर आदी गावांत महेंद्रशेठ घरत गणरायाच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी महेंद्रशेठ घरत यांचा गावोगावच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यथोचित सन्मान केला.

Post a Comment

0 Comments