पनवेल (प्रतिनिधी):शास्त्रीय संगीत क्षेत्रात आपल्या सुरेल गायकीने, अखंड संगीत साधनेने आणि समाजाभिमुख कार्याने स्वतंत्र ओळख निर्माण करणारे रायगड भूषण पं.उमेश निवृत्तीबुवा चौधरी यांनी संगीत क्षेत्रातील आपल्या कार्याची माहिती, संगीत प्रेमींसाठी उपयुक्त साहित्य तसेच आपल्या कला प्रवासाची ओळख करून देणारी वेबसाईट सुरू केलीआहे. यावेबसाईटचे अनावरण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. खारघर येथे झालेल्या या कार्यक्रमास नादब्रम्ह साधना मंडळाचे संस्थापक तथा विख्यात शास्त्रीय व भजन गायक ह.भ. प.निवृत्तीबुवा चौधरी, अध्यक्ष वसंतशेठ पाटील,माजी नगरसेवक शंकर म्हात्रे,अनंता ठाकूर,नारायणबुवा पाटील यांच्यासह संगीत आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.पं. उमेश चौधरी यांच्या संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ वाटचालीचा डिजिटल दस्त ऐवज म्हणून ही वेबसाईट महत्त्वपूर्ण ठरणार आहे.त्यांच्या शास्त्रीय गायनाची साधना, गुरुपरंपरा,विविध संगीत कार्यक्रम, पुरस्कार व सन्मान, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम, तसेच संगीत क्षेत्रातील विविध योगदानाची माहिती या माध्यमातून रसिकांना उपलब्ध होणार आहे. संगीत ही केवळ मनोरंजनाची कला नसून ती संस्कार,साधना आणि समाज जागृतीचे प्रभावी माध्यम आहे, या विचारातून पं.उमेश चौधरी यांनी आपल्या संगीत प्रवासाला सामाजिक कार्याची जोड दिलीआहे. त्यांच्या या कार्याचा व्यापक परिचय डिजिटल माध्यमातून करून देण्यासाठी वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे. पं.उमेश चौधरी यांना भजन सम्राट निवृत्तीबुवा चौधरी यांचा समृद्धसंगीत वआध्यात्मिक वारसा लाभला आहे. गुरुपरंपरेचा सन्मान राखत शास्त्रीय संगीताची अखंड साधना करणाऱ्या पं.उमेश चौधरी यांनी संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. आकाशवाणी,दूरदर्शन तसेच विविध सांस्कृतिक व्यासपीठांवरून त्यांनी आपल्या गायन कलेची छाप उमटविली आहे.यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पं.उमेश चौधरी यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाचे कौतुक करून, “संगीताची समृद्ध परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी डिजिटल माध्यमाचा प्रभावी वापर होत आहे.ही वेबसाईट संगीतप्रेमी, विद्यार्थी आणि नवोदित कलाकारांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल,” असा विश्वास व्यक्त केला. यावेळी पं. उमेश चौधरी यांनी आपल्या संगीत प्रवासात मार्गदर्शन करणारे गुरु, कुटुंबीय,रसिक आणि सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. संगीतही अखंड साधना असून,गुरूंचे आशीर्वाद,रसिकांचे प्रेम आणि नव्या पिढीला संगीताची समृद्ध परंपरा देण्याची जबाबदारी याच भावनेतून पुढील वाटचाल सुरू ठेवणार असल्याचे त्यांनीसांगितले.स्वर, साधना,संस्कार आणि समाजसेवा यांचा सुरेल संगम असलेल्या पं.उमेश चौधरी यांच्या कार्याचा डिजिटल परिचय करून देणारी ही वेबसाईट त्यांच्या संगीतvप्रवासातील एक नवे पर्व ठरले आहे. पं.उमेश चौधरी यांच्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या वेबसाईटच्या माध्यमातून त्यांच्या संगीत प्रवासाची विविधांगी माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.त्यांच्या जीवनप्रवासापासून संगीत साधना,गुरुपरंपरा, शास्त्रीय गायन, विविध कार्यक्रम,पुरस्कार व सन्मान, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम, संगीत क्षेत्रातील योगदान आणि भविष्यातील उपक्रमयांची माहिती या डिजिटल माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेषतः शास्त्रीय संगीत शिकणारे विद्यार्थी, नवोदित गायक-कलाकार, संगीत अभ्यासक आणि देश-विदेशातील संगीतप्रेमी यांच्यासाठी ही वेबसाईट माहितीचे प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे.बदलत्या काळानुसार संगीत क्षेत्रातील माहिती डिजिटल माध्यमातून अधिक व्यापक पातळीवर पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जातआहे.पारंपरिक संगीतकलेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्धपरंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या त्यांच्या प्रयत्नाचे संगीत प्रेमींकडून स्वागत होत आहे.
0 Comments