खारघर : पांडवकडा धबधब्यात तरुण बुडाल्याची माहिती मिळताच सिडको अग्निशमन केंद्र, खारघरच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मुसळधार पाऊस आणि धबधब्यातील वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहाची पर्वा न करता जवानांनी शोधमोहीम सुरू केली.शोध घेत असताना सुमारे १० ते १२ फूट खोल दगडाच्या कपारीत २३ वर्षीय आदित्य विश्वकर्मा आढळून आला. जवानांनी अथक प्रयत्न करून त्याला सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर स्ट्रेचरच्या सहाय्याने डोंगराखाली आणून रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.ही धाडसी बचावमोहीम अग्निशमन प्रणेता प्रशांत दरेकर, फायरमन सूरज पाटील, प्रीतम पाटील, चेतन पवार आणि कौस्तुभ वायदंडे यांनी राबवली. घटनास्थळी खारघर पोलीस ठाण्याचे कर्मचारीही उपस्थित होते.
0 Comments