पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाची सर्वसाधारण बैठक संपन्न

 
पनवेल(प्रतिनिधी):सक्रिय पत्रकारांची नोंदणीकृत संस्था असणाऱ्या पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाची मासिक सर्वसाधारण बैठक राजेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक २२ जुलै रोजी पनवेलच्या शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. आगामी काळातील पर्यावरण पूरक कार्यक्रम आणि नियोजनाचे बाबत सदर बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीच्या प्रारंभी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंती बद्दल त्यांना अभिवादन करण्यात आले. युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचे नुकतेच निधन झाल्याबद्दल पनवेल तालुका पत्रकार मंचाच्या सदस्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. मंचाचे सदस्य असणारे लालचंद यादव यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने केक कापण्यात आला.पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने आगामी काळामध्ये पर्यावरण पूरक कार्यक्रम हाती घेतलेले आहेत. इको फ्रेंडली गणेश, वृक्ष संवर्धन, वृक्ष वाटप, बहुवार्षिक देशी वृक्षांचे बीजारोपण अशा अनेक कार्यक्रमांच्या नियोजनासंदर्भात चर्चा करण्यात आली. मंचाच्या परंपरेत नुसार आयोजित करण्यात येणाऱ्या वर्षा सहलीचे नियोजन देखील या बैठकीत करण्यात आले.पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या सर्वसाधारण बैठकीला अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, सरचिटणीस हरेश साठे, सल्लागार विवेक पाटील, सल्लागार संजय कदम, सल्लागार मंदार दोंदे, निलेश सोनावणे, प्रवीण मोहोकर, लालचंद यादव यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments