वावेघर येथील रक्तदान शिबिरात सतिश साठे यांचा सहभाग; रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी

पनवेल (प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्याचे कार्यकुशल व लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुळसुंदे ग्रामपंचायतीचे सदस्य सतिश साठे यांनी वावेघर येथे आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या रक्तदान शिबिराला विभागीय जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. अविनाश गाताडे, गुरुनाथ गाताडे, चंदर माने यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान हे सर्वोच्च दान मानले जाते आणि अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजात रक्तदानाबाबत जनजागृती होऊन गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मोठी मदत होते, असा संदेश यावेळी देण्यात आला. 

Post a Comment

0 Comments