पनवेल (प्रतिनिधी): महाराष्ट्राचे कार्यकुशल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन पनवेल भाजप मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेत पार पडले. समाजहिताचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले.न्यू पनवेल कर्नाटक संघ हॉल येथे आयोजित या शिबिराला प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील तसेच सभागृहनेते ॲड. प्रकाश बिनेदार उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक ॲड. मनोज भुजबळ, एकनाथ गायकवाड, समीर ठाकूर, संतोष शेट्टी, शशिकांत शेळके, नगरसेविका कविता चौतमोल, सीता पाटील, राजेश्री वावेकर, डॉ. अस्मिता घरत, कुसुम पाटील, ॲड. शिवानी घरत, नवीन पनवेल शहर मंडळाचे सरचिटणीस प्रशांत फुलपागार, जगदीश घरत, पंकज घाडी, आरपीआयचे प्रभाकर कांबळे, नवीन पनवेल शहर मंडल युवा मोर्चा अध्यक्ष मयूर कदम, उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस अक्षय सिंग, प्रभाग १५ अध्यक्ष संजय कांबळे, प्रभाग १६ अध्यक्ष शिवाजी भगत तसेच प्रभाग १७ अध्यक्ष विजय म्हात्रे उपस्थित होते.
यावेळी आयोजक नवीन पनवेल भाजप मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक दशरथ म्हात्रे यांनी सर्वांचे स्वागत व आभार मानले.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर राबविण्यात येणाऱ्या समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक करत रक्तदान हे सर्वोत्तम दान असून गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरत असल्याचे सांगितले. वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक उत्तरदायित्व जपणाऱ्या अशा उपक्रमांचे आयोजन महत्वपूर्ण असल्याचे दशरथ म्हात्रे यांनी म्हंटले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांचे अभिनंदन करून त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
0 Comments