लोकनेते रामशेठ ठाकूर प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व- वाय.टी. देशमुख

पनवेल (प्रतिनिधी) :माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रेरणादायी व्यक्तिमत्व असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पार्टी उलवे नोड २ च्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून बोलताना वाय.टी. देशमुख यांनी जिद्द, चिकाटी व परिश्रमाची कास धरून विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी व्हावे व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याप्रमाणे अपार कष्ट व मेहनत करून यशस्वी होऊन लोकहिताचा व दातृत्वाचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले.श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने दरवर्षी विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वितरित केले जाते. त्यानुसार २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी रयत शिक्षण संस्थेच्या येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप मंडळाच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते भाऊशेठ पाटील, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा घरत, रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या निकिता खारकर, पनवेल पंचायत समितीचे सदस्य वितेश म्हात्रे, स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य विश्वनाथ कोळी, संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रवींद्र भोईर, रतनशेठ भगत, माजी उपसरपंच विजयनाना घरत, स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर, सुहास भगत, विनायक कोळी, सुदर्शन घरत, जयवंत देशमुख, भाऊ भोईर, सुभाष गोंधळी, प्रतिश पाटील, गणेश पाटील, धीरज ओवळेकर, निलेश खारकर, शैलेश भगत, किशोर पाटील, राजेश पाटील, चेतन पाटील, विराज देशमुख, अनिल कोळी, जयश्री घरत, उपमुख्याध्यापक विलासराव लेंगे, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रवींद्र भोईर, लाईफ वर्कर देवेंद्र म्हात्रे, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख संजय उगले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे औचित्यत्ताधून जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेज स्थानिक शाळा समितीच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल वाय.टी. देशमुख आणि विजय घरत यांचा तर विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीच्या सदस्यपदी पुनर्निवड झाल्याबद्दल विश्वनाथ कोळी व अनंताशेठ ठाकूर यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक रवींद्र भोईर यांची संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. तर मुख्याध्यापक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल उपशिक्षिका दर्शना माळी यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

Post a Comment

0 Comments