डॉ. श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन परिसरात जागतिक पर्यावरणदिनी फुलबाग बहरली

पनवेल/ (प्रतिनिधी):जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. काँग्रेस भवन परिसर सुशोभित करण्यासाठी कार्यालयाच्या दर्शनी भागात आकर्षक फुलबाग विकसित करण्यात आली असून, वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा डॉ. श्रुती म्हात्रे आणि नगरसेवक हरेश केणी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवनासमोर वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.यावेळी पर्यावरण सेलचे अध्यक्ष सुरेश पाटील आणि राजीव पाटील यांनी आयोजित केलेल्या पर्यावरण जनजागृती कार्यक्रमातही पनवेल शहर काँग्रेस कमिटीने सक्रिय सहभाग नोंदविला. या माध्यमातून पक्षातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित केली. तसेच संघटनात्मक एकतेचा संदेशही देण्यात आला.दरम्यान, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार पुढील सात दिवस विशेष वृक्षारोपण अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत विविध ब्लॉक स्तरांवर शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन किमान दोन झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या मोहिमेची सुरुवात विजय केणी आणि बबन केणी यांनी तळोजा परिसरातून केली असून, प्रत्यक्ष अंमलबजावणीला वेग देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.या उपक्रमात सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत पर्यावरण संवर्धनासाठी आपापल्या परीने योगदान दिले. कार्यक्रमास माजी नगरसेविका शशिकला सिंह, आरती ठाकूर, अनुपमा, सायरा, चेतन म्हात्रे, डॉ. विजयकुमार चव्हाण, अभिजीत मुंडक्कळ, जोस जेम्स, लतिफ नलखंडे, मुन्नावर देशमुख, अरविंद यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच प्रत्यक्ष कृतीतून हरित पनवेल घडविण्याचा संकल्प या उपक्रमातून व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments