पनवेल (प्रतिनिधी) : समाजातील वंचित, दुर्लक्षित आणि गरजू घटकांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे, लोकहिताच्या विषयांवर ठामपणे आवाज उठवणारे तसेच ‘सामान्य नागरिक’ वृत्तपत्र व न्यूज चॅनलचे संपादक, प्रखर पत्रकार तथा भाजप अल्पसंख्यांक नेते साबीर शेख यांचा ६ जून रोजी वाढदिवस आहे.
पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांच्या समस्या शासन-प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी साबीर शेख यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. सामाजिक, शैक्षणिक, विकासात्मक आणि लोकहिताच्या विविध प्रश्नांवर त्यांनी प्रभावीपणे प्रकाश टाकत सर्वसामान्य नागरिकांचा आवाज बुलंद केला आहे. ‘सामान्य नागरिक’ या वृत्तपत्र व न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेला समाजहिताचे प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.अन्यायाविरुद्ध ठाम भूमिका घेणे, सत्याची बाजू निर्भयपणे मांडणे आणि दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणे ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये मानली जातात. पत्रकार म्हणून असलेली जबाबदारी आणि संपादक म्हणून असलेली दूरदृष्टी यामुळे त्यांनी समाजात विश्वासार्ह व आदरणीय स्थान निर्माण केले आहे.
सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्यांची ओळख आहे. मतभेद असले तरी आपली भूमिका स्पष्टपणे मांडणारे, मात्र समोरच्याच्या भावना जपत संयमाने संवाद साधणारे अशी त्यांची कार्यशैली आहे. एखाद्या विषयावर चर्चा किंवा वाद निर्माण झाला तरी तो केवळ वादासाठी नसून समोरच्या व्यक्तीच्या हिताचा विचार करून योग्य दिशा मिळावी या उद्देशानेच ते आपले मत मांडतात. स्पष्टवक्तेपणा आणि संवेदनशीलता यांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो.मित्रपरिवार, सहकारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच सर्वसामान्य नागरिकांशी आत्मीयतेचे संबंध जपणारे साबीर शेख यांचे पत्रकारिता आणि समाजकारणातील योगदान प्रेरणादायी मानले जाते. समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी, लोकहितासाठीची तळमळ आणि जनसामान्यांच्या प्रश्नांप्रती असलेली संवेदनशीलता यामुळे त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.६ जून रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार, सहकारी आणि हितचिंतकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि भावी वाटचालीसाठी यश लाभावे, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत.
0 Comments