पनवेल (प्रेरणा गावंड) :पनवेल येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते अरविंद म्हात्रे यांनी आदिवासी बांधवांच्या घरकुलाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. तालुक्यात अद्याप आदिवासींसाठी घरकुल योजना प्रभावीपणे राबवली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.यावेळी त्यांनी पंतप्रधान आवास योजनेत आदिवासी बांधवांचा समावेश करून त्यांना अनुदानाच्या माध्यमातून घर मिळावे, तसेच आदिवासींसाठी असलेल्या विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात, अशी मागणी केली. याशिवाय आवश्यक शासकीय कागदपत्रांची पूर्तता करून आदिवासींना शिक्षण व इतर योजनांमध्ये लाभार्थी म्हणून समाविष्ट करण्यावरही त्यांनी भर दिला.या सर्व मागण्यांची आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुइके यांनी गंभीर दखल घेतली. आपण दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला योग्य ते आदेश देण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.या प्रसार माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमुळे सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष नेते यामध्ये वास्तविक सत्य काय आहे हे शोधणे महत्त्वाचे ठरत आहे. विकासाच्या मुद्द्यावर सत्तेत आलेले पक्ष या आरोपानंतर आदिवासी बांधवांवर उपस्थित केलेल्या विषयावर विरोधी पक्षाच्या आरोपाला काय उत्तर देतील याकडे पाहणे महत्त्वाचे ठरते
0 Comments