पनवेल (प्रेरणा गावंड):महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांचा वाढदिवस ३ एप्रिल रोजी राज्यभरात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विविध सामाजिक उपक्रम, अभिनव कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत हा सोहळा संस्मरणीय ठरला.वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी महिलांसाठी मार्गदर्शन शिबिरे, गरजूंसाठी अन्नदान, तसेच सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबवण्यात आले. अनेक ठिकाणी केक कापून, पुष्पगुच्छ देऊन आणि जल्लोषात शुभेच्छा देत कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. राज्यभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी प्रत्यक्ष भेट देत तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून संध्याताईंवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
संध्याताई सव्वालाखे या आपल्या अभ्यासू, कर्तृत्ववान आणि दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वामुळे ओळखल्या जातात. महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला असून, त्यांच्या नेतृत्वाखाली महिला काँग्रेस संघटना अधिक सक्षम, संघटित आणि सक्रिय बनली आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे अनेक महिलांना समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.यावेळी डॉ. शिल्पा पाठक ठाकूर (महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस जनरल सेक्रेटरी) यांनी संध्याताईंना मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वाखाली समाजहिताची वाटचाल अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.संपूर्ण कार्यक्रमात उत्साह, आनंद आणि सामाजिक बांधिलकीचा संगम पाहायला मिळाला. संध्याताईंच्या कार्याचा गौरव करत, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
0 Comments