मान्यवरांच्या उपस्थितीत हरेश साठे यांचा सन्मान आणि वाढदिवस उत्साहात

प्रतिनिधि (पनवेल):रायगड प्रेस क्लबच्या पुरस्काराने सन्मान झाल्याबद्दल दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पत्रकार हरेश साठे यांचे कौतुक करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. तसेच वाढदिवसाच्याही शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिले. तसेच भाजप नेते सुप्रसिद्ध सनदी लेखापाल माजी खासदार किरीट सोमेय्या, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, सभागृहनेते ऍड. प्रकाश बिनेदार यांच्या पत्रकार मित्र आणि हितचिंतकांनी हरेश साठे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.

Post a Comment

0 Comments