खारघर परिसरातही अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेते तसेच दुकानांच्या हद्दीबाहेर साहित्य ठेवून सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. रस्त्याच्या कडेला आणि दुकानाबाहेर ठेवण्यात आलेले अनधिकृत साहित्य पालिका पथकाने जप्त केले.दरम्यान, प्रभाग समिती ‘क’ कामोठे अंतर्गत ३ ऑक्टोबर रोजी विशेष अतिक्रमणविरोधी मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत अनधिकृत अतिक्रमणे हटवून एकूण २८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नावडे उपविभागातही अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या हातगाड्या तसेच फळे-भाजी विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून शनिवारी १२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पनवेल, कामोठे आणि नावडे उपविभागांत करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत एकूण २ लाख ४७ हजार रुपयांचा दंड पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील मुख्य रस्ते, शाळांच्या परिसरासह सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ही धडक मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिक तसेच स्थानिक व्यापाऱ्यांनी सार्वजनिक जागांवर अनधिकृतपणे साहित्य ठेवून वाहतुकीस अथवा पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करू नये, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त महेश कुमार मेघमाळे यांनी केले आहे.
0 Comments