खालापूर | (साबीर शेख) :-श्री गणेशोत्सवानिमित्त पोसरी येथे आमदार महेंद्र थोरवे यांच्या निवासस्थानी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले. भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देणाऱ्या या धार्मिक सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून श्री गणरायाचे दर्शन घेतले.यावेळी रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल (IPS), भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत शेठ साबळे ,खोपोली नगरपरिषद उपनगराध्यक्ष विक्रम साबळे यांच्यासह महायुतीतील मित्रपक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक, राजकीय, प्रशासकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावत श्री सत्यनारायण महापूजेच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी पूजा-दर्शन घेत श्री गणरायाचे आशीर्वाद घेतले. यावेळी गणेशोत्सवाच्या शुभेच्छांची देवाणघेवाणही करण्यात आली.मान्यवरांच्या स्वागत-सन्मानासाठी आमदार महेंद्र थोरवे स्वतः उपस्थित होते. पोसरी ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्यात सहभाग घेतला.गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्तीबरोबरच सामाजिक सलोखा आणि आपुलकीची भावना दृढ करण्याचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने पोसरी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
0 Comments