भारतीय जनता पार्टी पनवेलतर्फे ‘बाप्पा मोरया’ घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा

पनवेल (प्रतिनिधी):भारतीय जनता पार्टी, पनवेल यांच्या वतीने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘बाप्पा मोरया’ घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या कलागुणांना वाव देण्यासोबतच पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश देणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असून, विजेत्यांना एकूण २५ हजार रुपये पर्यंतची आकर्षक पारितोषिके जिंकण्याची संधी आहे. 
गणपती सजावटीसाठी थर्मोकॉलच्या वस्तूंचा वापर करण्यास सक्त मनाई असून, पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करणे अनिवार्य आहे. ही स्पर्धा पनवेल शहरातील प्रभाग क्रमांक १४, १८, १९ आणि २० मधील रहिवाशांसाठी खुली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १२ सप्टेंबर २०२६ पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणी करताना स्पर्धकाचे संपूर्ण नाव, पत्ता व संपर्क क्रमांक देणे बंधनकारक राहील. स्पर्धेतील परीक्षकांचा निर्णय अंतिम व सर्वांना बंधनकारक राहील.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिलेला QR कोड स्कॅन करून अथवा ८७६७१४९२०३ या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करता येईल. गणेशोत्सव हा श्रद्धेसोबतच सामाजिक व पर्यावरणीय जाणीव जपणारा उत्सव ठरावा, यासाठी प्रभागातील नागरिकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पनवेल महापालिकेचे नगरसेवक तथा माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments