कामोठ्यात दहीहंडीचा थरार; दत्त गोविंद पथकाने पटकावले ८ लाख ८८ हजार ८८८ रुपयांचे पारितोषिक

कामोठे (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टी व प्रदीप भगत युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी उत्सव २०२६ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला.या उत्सवाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दहीहंडी फोडण्याचा मान नोपाडा येथील दत्त गोविंद पथकाने मिळवला. विजेत्या पथकाला तब्बल ८ लाख ८८ हजार ८८८ रुपयांचे भव्य पारितोषिक प्रदान करण्यात आले. 
दहीहंडी फोडल्यानंतर गोविंदा पथकाच्या सदस्यांनी जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला.या कार्यक्रमाला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, पनवेलचे महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, उत्तर रायगड भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, प्रभाग समिती ‘क’ सभापती रवी जोशी, भाजपा कामोठे शहर अध्यक्ष व नगरसेवक विकास घरात, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, समाजसेवक भाऊ भगत तसेच भाजपा कामोठे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध लावणीचा कार्यक्रम, विविध मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच आकर्षक वेशभूषेत सहभागी झालेल्या चिमुकल्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांना उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
संपूर्ण दहीहंडी उत्सवाचे आयोजन व नियोजन नगरसेवक प्रदीप भगत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. उत्सव यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष सचिन यमगर, उपाध्यक्ष सुनील देसाई, खजिनदार शैलेश परबळकर यांच्यासह प्रदीप भगत युवा मंचच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. नागरिक, मान्यवर, गोविंदा पथके आणि कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे दहीहंडी उत्सवाला भव्य स्वरूप प्राप्त झाले.

Post a Comment

0 Comments