‘क्वीन ऑफ द स्काइज’चे नवी मुंबईत पदार्पण; मुंबईच्या हवाई मालवाहतुकीला नवी दिशा

पनवेल (प्रतिनिधी ):नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई मालवाहतूक सेवेच्या विस्तारात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. नॅशनल एअरलाइन्सचे बोईंग ७४७ एफ मालवाहू विमान जर्मनीतील फ्रँकफर्ट-हॅन या प्रमुख युरोपीय मालवाहतूक केंद्रावरून नवी मुंबई विमानतळावर दाखल झाले. नवी मुंबई विमानतळावर दाखल झालेले हे पहिले बोईंग ७४७ मालवाहू विमान ठरले आहे.
 नॅशनल एअरलाइन्सच्या ऐतिहासिक बोईंग ७४७ मालवाहू विमानाचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जलतोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले. मालवाहतूक घेऊन आलेल्या या दिग्गज विमानाच्या आगमनामुळे नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय मालवाहतूक सेवेला आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठता आला. नॅशनल एअरलाइन्सच्या ताफ्यात सध्या नऊ बोईंग ७४७ मालवाहू विमाने आहेत. मोठ्या प्रमाणातील मालाची वाहतूक, मानवतावादी मदत आणि विशेष मालवाहतूक सेवांसाठी या विमानांचा वापर केला जातो

Post a Comment

0 Comments