रिहॅबच्या नावाखाली कैद?; वाजे गावातील आशा कि किरण केंद्रातून युवकाची सुटका, अत्याचाराच्या आरोपांनी खळबळ!


पनवेल / (केवल महाडिक) :नवी मुंबई येथील अविदिपती दास या युवकाला वाजे गाव परिसरातील "आशा की किरण" रिहॅब सेंटरमध्ये त्याच्या इच्छेविरुद्ध डांबून ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, त्याच्यावर मानसिक व शारीरिक अत्याचार झाल्याचाही दावा करण्यात आला आहे. या धक्कादायक आरोपांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवकाला त्याच्या संमतीशिवाय रिहॅब सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. त्याच्यावर होत असलेल्या कथित अत्याचारांची माहिती समोर आल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि बुधवार, दि. २ जुलै रोजी त्याची सुटका करण्यात आली.या कारवाईदरम्यान पनवेल महानगर अध्यक्षा सौ. स्वरूपा सुर्वे, पनवेल उपशहर अध्यक्षा सौ. साक्षी दळवी तसेच नवीन पनवेल सचिव सौ. मनीषा देशमुख या उपस्थित होत्या.दरम्यान, संबंधित रिहॅब सेंटरच्या कार्यपद्धतीवर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, युवकाला इच्छेविरुद्ध ठेवण्यात आले होते का, तसेच त्याच्यावर झालेल्या कथित अत्याचारांची चौकशी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments