पनवेल(प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडल, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. उत्तर रायगड जिल्हा संघटनात्मक नियुक्ती मोर्चा आघाडी सेल नियुक्त्यांमध्ये आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्षपदी सिताराम चौधरी, किसान मोर्चा जिल्हाध्यक्षपदी सागर सांगडे, दक्षिण भारतीय सेल जिल्हा संयोजकपदी सुजित पुजारी, कामगार आघाडी जिल्हा संयोजकपदी रविंद्र नाईक, शिक्षक सेल जिल्हा संयोजकपदी सागर रंधवे, वैद्यकीय सेल जिल्हा संयोजकपदी डॉ. संतोष आगलावे, कायदा सेल जिल्हा संयोजकपदी अॅड. गायत्री परांजपे, व्यापारी आघाडी जिल्हा संयोजकपदी संजय तन्ना, मच्छीमार सेल जिल्हा संयोजकपदी प्रदीप नाखवा, बेटी बचाव बेटी पढाव जिल्हा संयोजकपदी नीता माळी आणि अभियंता सेल जिल्हा संयोजकपदी अल्पेश पाडावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महिला मोर्चा, युवा मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चा, ओबीसी मोर्चा तसेच विविध मंडलांमध्येही सरचिटणीस पदांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी दिशा जाधव व शिल्पा म्हात्रे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी अक्षय सिंग व मनोज पारटे, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी अनुप शिंदे व अक्षय लोखंडे, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी अविनाश गाताडे व यतीन पाटील यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय नवीन पनवेल मंडल सरचिटणीसपदी प्रशांत फुलपगार तर खोपोली मंडल सरचिटणीसपदी विनायक माडपे व विकास खुरपुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत आगामी काळात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येकाने सक्रियपणे कार्य करावे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी केले आहे.
0 Comments