कार्यसम्राट नगरसेवक तथा सभागृह नेते अँड. प्रकाश बिनेदार अभिष्टचिंतन दिन

पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान सभागृह नेते, भाजप प्रवक्ते तथा कार्यसम्राट नगरसेवक अँड. प्रकाश बिनेदार यांचा १ जून रोजी अभिष्टचिंतन दिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत आहे. समतेचा विचार, विकासाचा ध्यास आणि जनसेवेचा विश्वास या त्रिसूत्रीवर कार्य करणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.पनवेल व रायगड जिल्ह्यातील अभ्यासू, उच्चशिक्षित आणि जनसामान्यांशी नाळ जोडलेले नेतृत्व म्हणून अँड. प्रकाश बिनेदार यांना मानले जाते. भाजपचे ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर यांचे समर्थक तसेच कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात वेगळी छाप निर्माण केली आहे.पनवेल महानगरपालिकेच्या कारभारात प्रभावी भूमिका बजावत त्यांनी जनहिताच्या अनेक प्रश्नांवर ठाम भूमिका घेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यशैलीची दखल घेत माजी सभागृह नेते परेशशेठ ठाकूर यांनी सभागृह नेतेपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती.महापौर नितीन पाटील यांची पालिकेतील भक्कम ढाल तसेच सत्ताधारी पक्षाची बुलंद तोफ म्हणून सभागृहात त्यांच्याकडे पाहिले जाते. प्रभावी मांडणी, प्रशासनावरील पकड आणि विकासकामांचा सखोल अभ्यास यामुळे ते सर्व स्तरांवर परिचित आहेत.सर्वसामान्य, गोरगरीब, शोषित, वंचित, दिव्यांग, पीडित आणि अनाथ घटकांसाठी सातत्याने कार्य करणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. दलित, मागासवर्गीय तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी ते सातत्याने आवाज उठवत असल्याने त्यांना “सामान्य माणसाचा आवाज” असेही संबोधले जाते.सभागृह नेतेपदाची धुरा सांभाळल्यानंतर आवास, निवास, रोजगार, सफाई आणि विविध जनकल्याणकारी योजनांच्या माध्यमातून त्यांनी पनवेलकरांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे.दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, शैक्षणिक साहित्य वाटप, दिव्यांगांना मदत, वृक्षारोपण, अन्नदान आणि विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. सामाजिक बांधिलकी जपत राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचा त्यांचा प्रयत्न अनेक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.“सत्ता ही केवळ पदासाठी नसून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्यासाठी असते,” या विचाराने कार्य करणारे अँड. प्रकाश बिनेदार हे पनवेलच्या राजकारणातील प्रभावी आणि जनाधार असलेले नेतृत्व मानले जाते. त्यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत

Post a Comment

0 Comments