दीपक फर्टिलायझर्स तर्फे ईशान्य फाउंडेशन आणि नामटेक यांची पनवेलमध्ये उद्योगाभिमुख कौशल्यविकासासाठी भागीदारी

पनवेल (प्रतिनिधी): दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सहाय्याने कार्यरत सामाजिक विकास संस्था ईशान्य फाउंडेशनने महाराष्ट्रातील पनवेल येथील भोकरपाडा येथे प्रगत कौशल्य विकासासाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारण्यासाठी नामटेक (NAMTECH) सोबत सामंजस्य करार  करण्यात आला आहेनामटेक ही आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी स्थापन केलेल्या सेक्शन ८ कंपनीचा एकभाग असूनसध्या ती गुजरातमधील गांधीनगर येथे कौशल्य विद्यापीठ उभारण्याचेकामकरतआहे.‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्याचा हा प्रकल्प दीपक फर्टिलायझर्सच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांचा भाग असूनरोजगारक्षमता वाढवणे आणि उद्योगसिद्ध मनुष्यबळ तयार करण्यासाठी भविष्याभिमुख कौशल्य विकास परिसंस्था उभारणे हा यामागील उद्देश आहेहा उपक्रम दीपक फर्टिलायझर्स चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर  एस. सी. मेहता, तसेच ईशान्य फाउंडेशन मॅनेजिंग ट्रस्टी पारुल मेहता यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व व मार्गदर्शनातून साकार झाला आहेशिक्षण आणि कौशल्य विकासाद्वारे सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.या तीन वर्षांच्या सहकार्याअंतर्गतनामटेक (NAMTECH) ईशान्य फाउंडेशनला सेंटर ऑफ एक्सलन्स” स्थापन व कार्यान्वित करण्यासाठी तांत्रिक सल्ला आणि अंमलबजावणीसाठी मदत करणार आहेया उपक्रमाद्वारे बेरोजगार युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबरोबरच उद्योगात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी कौशल्यवृद्धी आणि पुनःकौशल्यविकास कार्यक्रमदेखील राबविण्यात येणार आहेत.पनवेलमधील भोकरपाडा येथे जुन्या मुंबईपुणे महामार्गालगत दोन एकर जागेवर हे उत्कृष्टता केंद्र विकसित करण्यात येणार आहेउत्पादनअभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रांतील बदलत्या गरजा लक्षात घेऊन कौशल्य दरी कमी करणेउत्पादकता वाढविणे आणि रोजगार क्षमतेत सुधारणा घडविणे हा या संस्थेचा उद्देश असेल.या उत्कृष्टता केंद्रामध्ये उत्पादनअभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रांतील प्राधान्यक्षेत्रे व रोजगार भूमिका निश्चित करण्यात येतीलतसेच विद्यार्थ्यांची मागणी आणि उद्योगाच्या गरजेनुसार प्रवेश क्षमतेचे नियोजन केले जाईलआधुनिक वर्गखोल्याप्रयोगशाळाकार्यशाळानवोपक्रम केंद्रेप्रशासकीय सुविधावसतिगृहकॅफेटेरिया आणि आवश्यक पायाभूत सुविधा येथे उपलब्ध असतीलहा प्रकल्प अंदाजे ३५ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन असूनबांधकाम व टप्प्याटप्प्याने विकास नामटेकच्या तांत्रिक शिफारसी आणि जागा नियोजनानुसार करण्यात येईलउद्योग भागीदारांच्या सहकार्याने अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि नवोपक्रम केंद्रे विकसित केली जातीलया सामंजस्य करारावर ईशान्य फाउंडेशन तर्फे दीपक फर्टिलायझर्सचे प्रेसिडेंट कॉर्पोरेट गव्हर्नन्स नरेश पिनिसेट्टी आणि संचालक एमपीशिंदे यांनी तर नामटेक तर्फे महासंचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉइब्राहिम हफीजूर रहमान यांनी स्वाक्षरी केली.

 

Post a Comment

0 Comments