खारघर(प्रतिनिधी): गोदरेज प्रॉपर्टीजने आपल्या 'गोदरेज वरण्या' या नवीन निवासी प्रकल्पाचे खारघरमधील सेंट्रल पार्क येथे एका ऐतिहासिक ड्रोन शोद्वारे अनावरण केले. खारघरमध्ये अशा प्रकारे अत्याधुनिक आणि अनोख्या ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून रियल इस्टेट प्रकल्पाची घोषणा केली जाण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. 'गोदरेज वरण्या' च्या या भव्य अनावरणापूर्वी तीन दिवसांचा एक विशेष उपक्रम खारघरमधील विविध ठिकाणी राबवण्यात आला होता. याची सुरुवात खारघरच्या मुख्य चौकांमध्ये बसवण्यात आलेल्या 'मेकॅनिकल बटरफ्लाय' कलाकृतींनी झाली. त्याचबरोबर संपूर्ण शहरातील बॅनर्सवर या फुलपाखरांचे बोधचिन्ह वापरून सेंट्रल पार्कमधील भव्य सोहळ्याचे संकेत देण्यात आले होते. खारघरमधील डोंगराळ परिसरात आढळणाऱ्या विविध प्रजातींपासून प्रेरणा घेऊन, एलईडी प्रकाशझोतात उजळणाऱ्या या हालचाली करणाऱ्या कलाकृती साकारण्यात आल्या होत्या. गृहप्रकल्पाच्या डिझाइनमधील 'परिवर्तन आणि पुनरुज्जीवन' या संकल्पनांचे हे एक प्रकारे दृश्य स्वरूप होते. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आणि मुख्य सोहळ्यासाठी एक पोषक वातावरण तयार झाले.सोहळ्याचा उत्साह उत्तरोत्तर वाढत गेला, 'बायोनिक' फुलपाखरे आणि एलईडी पॅनेलने सज्ज असलेल्या ड्रोन्सनी खारघरच्या आकाशात झेप घेतली आणि त्यांच्या रोषणाईने खारघरचे आकाश झळाळून उठले. सेंट्रल पार्क येथील या सोहळ्याची सांगता ५०० ड्रोन्सच्या एका चित्तथरारक 'सिंक्रोनाइज्ड' शोने करण्यात आली. विद्युत रोषणाई आणि फटाक्यांच्या अतिषबाजीमध्ये 'गोदरेज वरण्या'चा लोगो दिमाखात झळकला. या सादरीकरणातून खारघरचे वाढते महत्त्व अधोरेखित करण्यात आले; अटल सेतू, नियोजित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सुधारित दळणवळण जाळ्यामुळे खारघर आता एक प्रमुख 'अर्बन हब' म्हणून उदयास येत आहे. निसर्गरम्य टेकड्या आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधांचा विकास यांचा संगम साधणारे खारघरचे वेगळेपण या कार्यक्रमातून ठळकपणे मांडण्यात आले.
0 Comments