रस्ता सुरक्षा आठवडा अभियानांतर्गत तळोज्यात ४०० हून अधिक चालकांना आरोग्य व जागरूकता सेवा

प्रतिनिधी (पनवेल) :तळोजा येथे रस्ता सुरक्षा आठवडा अभियानाच्या निमित्ताने दीपक मायनिंग सोल्युशन लिमिटेड (DMSL, K8) आणि दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (DFPCL-K1) यांच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. या अभियानातून ४०० हून अधिक चालकांना आरोग्य सेवा व रस्ते सुरक्षा विषयक जागरूकता देण्यात आली.या उपक्रमांतर्गत चालकांसाठी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली. यामध्ये डोळ्यांची तपासणी करून गरजू चालकांना चष्मे देण्यात आले तसेच आवश्यकतेनुसार मोतियाबिंद शस्त्रक्रियेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. याशिवाय सामान्य आरोग्य तपासणी करून वैद्यकीय सल्ला व आवश्यक औषधे देण्यात आली.
तसेच मद्य व तंबाखूमुक्त वाहनचालना बाबत जनजागृती करण्यात आली. सुरक्षित वाहनचालन पद्धती, सीटबेल्टचा वापर व वाहतूक नियमांचे पालन यावर भर देण्यात आला. रस्ता सुरक्षा रॅलीद्वारे चालक व नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा संदेश देण्यात आला.या वेळी बोलताना डीएमएसएल-K8 चे युनिट हेड राजेंद्र थोरात यांनी सांगितले की, रस्ता सुरक्षा ही केवळ नियमांपुरती मर्यादित नसून ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. चालकांचे आरोग्य, जागरूकता आणि सुरक्षित वाहनचालन पद्धती यासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील.

Post a Comment

0 Comments