पनवेल (प्रतिनिधी): आपल्या प्रकल्पाच्या परिसरात स्थानिक रोजगार, कौशल्य विकास आणि समुदाय कल्याणासाठी टाटा स्टीलने आपली बांधिलकीचा पुन्हा एकदा पुनरुच्चार केला आहे . २०१८ मध्ये खोपोली प्रकल्पाचे अधिग्रहण केल्यापासून कंपनीच्या थेट कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण ३७ टक्क्यांवरून सुमारे ८२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. प्रकल्पात स्थानिक अधिवास असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी कंपनीकडून सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे टाटा स्टीलने म्हटले आहे.स्थानिक उद्योगांना पाठबळ देणे हेदेखील कंपनीच्या खरेदी प्रक्रियेचे एक महत्त्वाचे अंग आहे. सध्या, खोपोली येथे कार्यरत असलेल्या सुमारे ७० टक्के विक्रेते आणि सेवा भागीदार महाराष्ट्रातील अधिवासाचे आहेत. सुरक्षा, गुणवत्ता आणि कायदेशीर नियमांचे पालन यांना प्राधान्य देणाऱ्या पारदर्शक आणि गुणवत्ताधारित प्रक्रियेतून त्यांची निवड केली जाते. कंपनीकडून लागू असलेल्या सर्व कामगार, सुरक्षा, कर्मचारी कल्याण आणि सामाजिक सुरक्षा नियमांचे पालन केले जाते. कौशल्य विकास तसेच अप्रेंटिसशिप कार्यक्रमांच्या माध्यमातून स्थानिक तरुणांसाठी रोजगार आणि कौशल्यविकासाच्या संधी निर्माण करण्याचे काम सुरू असल्याचेही कंपनीने नमूद केले. टाटा स्टील फाउंडेशनच्या माध्यमातून परिसरातील समुदायांसाठी शिक्षण, आरोग्यसेवा, उपजीविका आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रातही विविध उपक्रम राबवले जात आहेत. प्रदेशाच्या शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी तसेच स्थानिक समुदायाच्या सर्वांगीण आणि सामायिक समृद्धीसाठी स्थानिक भागधारकांसोबत जवळून काम करण्याची कंपनीची बांधिलकी कायम असल्याचे टाटा स्टीलने स्पष्ट केले आहे.
0 Comments