सार्वजनिक ठिकाणी एईडी का आवश्यक?
अचानक हृदयक्रिया बंद पडण्याची घटना कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही वेळी घडू शकते. अशा वेळी रुग्णवाहिका किंवा वैद्यकीय मदत पोहोचेपर्यंतचा कालावधी अत्यंत निर्णायक ठरतो. सीपीआर आणि एईडीचा तातडीने वापर केल्यास रुग्णाला जीवनदान मिळण्याची शक्यता वाढते. रेल्वे स्थानके, विमानतळ, मॉल, शाळा-महाविद्यालये, क्रीडा संकुले, कार्यालये, मंदिरे तसेच विविध सार्वजनिक सभास्थळांवर एईडी उपलब्ध असणे त्यामुळे अत्यंत उपयुक्त ठरते.
जीवन वाचविण्यासाठी सामाजिक जबाबदारी
ज्याप्रमाणे सार्वजनिक इमारतींमध्ये अग्निशामक यंत्र आवश्यक मानले जाते, त्याचप्रमाणे एईडी हेही जीवनरक्षक उपकरण म्हणून सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असणे गरजेचे आहे. यासोबतच नागरिकांना सीपीआर आणि एईडी वापराबाबत प्राथमिक प्रशिक्षण मिळाल्यास आपत्कालीन परिस्थितीत अनेक मौल्यवान जीव वाचविणे शक्य होऊ शकते. कर्तव्यदक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेला हा उपक्रम केवळ एक भेट नसून सार्वजनिक आरोग्य आणि जीवनरक्षणाला प्राधान्य देणारा सामाजिक संदेश ठरत आहे.“हृदयक्रिया बंद पडल्यावर प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. वेळेवर सीपीआर आणि एईडी मिळाल्यास मृत्यूला थांबवून जीवनाला नवी संधी देता येते, या विचारातून साकारलेला हा उपक्रम पनवेलकरांसाठी निश्चितच जीवनदायी ठरणार आहे.
0 Comments