बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जेष्ठ नागरिकांना छत्री, विद्यार्थ्यांना रेनकोट-वह्यांचे वाटप

पनवेल, (प्रतिनिधी) : माजी सभापती, कोकण म्हाडाचे बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खारघरचा राजा गणेश चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप तसेच शालेय विद्यार्थ्यांना रेनकोट आणि वह्यांचे वितरण करण्यात आले.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जेष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रोत्साहन देण्यासोबतच जेष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
यावेळी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष विजय पाटील यांनी समाजातील विविध घटकांच्या गरजा ओळखून अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन सातत्याने केले जाईल, असे सांगितले. उपस्थित मान्यवरांनीही या उपक्रमाचे कौतुक करत सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमाचे आयोजन खारघरचा राजा गणेश चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष विजय पाटील, माजी सरपंच तथा श्री समर्थ महिला मंडळ अध्यक्षा वनिताताई विजय पाटील, प्रभाग क्रमांक ५ च्या नगरसेविका मिनलताई पाटील, उदय पाटील तसेच ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले होते.समाजहिताचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे जेष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

Post a Comment

0 Comments