पनवेलमध्ये ‘क्रांतिज्योत Power Expo 2026’चे आयोजन; महिलांसाठी सुवर्णसंधी

पनवेल (प्रतिनिधी) :सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी ‘क्रांतिज्योत Power Expo 2026’ या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या अध्यक्षा रुपालीताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येत असून, महिलांना स्वावलंबनासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा यामागील मुख्य उद्देश आहे. गेल्या काही वर्षांपासून फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, विशेषतः तळागाळातील महिलांना रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला हा एक्सपो महिलांसाठी महत्त्वपूर्ण संधी ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.या प्रदर्शनामध्ये महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री होणार असून,खाद्यपदार्थांचे स्टॉल, महिला उद्योजिकांसाठी नेटवर्किंगची संधी, तसेच विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांचा सन्मान यांसारख्या उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय नवनिर्वाचित नगरसेविकांचाही यावेळी गौरव करण्यात येणार आहे.सदर कार्यक्रम बुधवार, २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत न्यू पनवेल येथील सेक्टर १३ मधील कालीमाता हॉल येथे होणार आहे. यामध्ये सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत सन्मान व पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.या उपक्रमाद्वारे महिलांना स्वतःच्या व्यवसायाला चालना देण्याची संधी मिळणार असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिलांच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments