पनवेल (प्रतिनिधी):भारतीय जनता पार्टी नवीन पनवेल आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती नवीन पनवेल व आठ सामाजिक संस्था यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणेॅ भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहा दिवसांचा जयंती भीमोत्सव १० एप्रिल ते १५ एप्रिलपर्यंत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. शुक्रवार दि. १० एप्रिल ते १३ एप्रिल दरम्यान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, विविध मैदानी खेळांच्या स्पर्धा, महिलांसाठी संगीत खुर्ची, खेळ पैठणीचा तसेच ज्येष्ठ माता-पित्यांचा सन्मान सोहळा इत्यादि स्पर्धात्मक आणि सन्माननीय कार्यक्रम तसेच मंगळवार दि. १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता धम्म ध्वजारोहण, १०.३० वाजता सुप्रसिध्द प्रवचनकार, भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक आयु. कल्पेश कांबळे यांचे धम्म प्रवचन आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम बुध्दगया प्रतिष्ठान अंतर्गत अॅड प्रकाश बिनेदार आम्रपाली बुध्द विहार, बिनेदार काॅर्नर जवळ, नवीन पनवेल या ठिकाणी आयोजित केलेले आहेत.तसेच मंगळवार दि. १४ एप्रिल रोजी सायंकाळी ०६ वाजता महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आनंद शिंदे (शिंदेशाही बाणा) यांचा भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम आणि बुधवार दि. १५ एप्रिल रोजी सायंकाळी ०६ वाजता, महाराष्ट्राचे सुप्रसिध्द गायक जोडी साजन-विशाल यांचा भीमगीतांचा भरगच्च कार्यक्रम सिडको क्रिडांगण, बिनेदार मैदान, जय अंबे माता मंदिराशेजारी, सेक्टर २, नवीन पनवेल.(पूर्व) या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. या भीमोत्सवाला सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावे. असे आवाहन या कार्यक्रमांचे आयोजक व पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेता अॅड. प्रकाश बिनेदार यांनी केले आहे.
0 Comments