पनवेल (प्रतिनिधी): रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांचा जीवन प्रवास कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजने वार्षिक स्नेहसंमेलनात गाण्यांच्या आणि नाटिकेच्या माध्यमातून ‘कर्मयोगी एक अखंड प्रवास’ या शिर्षकाखाली सादर केला होता. त्याचे पुनश्च सादरीकरण चित्रफितीच्या माध्यमातून करण्यात आले. या चित्रफितीतून कुटुंबवत्सल, समाजाभिमुख आणि कार्यकर्त्यांशी घट्ट नातं जपणारा लोकनेता म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांसमोर प्रभावीपणे उभे राहिले. कार्यक्रमातील सादरीकरण पाहून उपस्थित मान्यवर आणि प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, सचिव विकास देशमुख, लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज कामोठेचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर, नगरसेवक परेश ठाकूर, संस्थेचे सहसचिव डॉ. राजेंद्र मोरे, डॉ. शिवलिंग मेनकुदळे, बंडू पवार, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य डी.बी.पाटील, ज्योत्स्ना ठाकूर, जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, लाईफ मेंबर रवींद्र भोईर, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य निकिता खारकर, माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य अॅड. राहुल घरत, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, धीरज ओवळेकर, धैर्यशील माने, प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे आदी उपस्थित होते.
0 Comments