नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत गुन्हे शाखेने 20 फेब्रुवारी 2026 रोजी सेक्टर 11 परिसरात सापळा रचत कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून आरोपीला बोलावून छापा टाकला. या कारवाईत हरिष विकास छारी, वय 25 वर्षे, रा. कोपरखैरणे याला अटक करण्यात आली. आरोपी अल्पवयीन मुलींना ग्राहकांना पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे. दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली असून त्या अनुक्रमे 16 व 14 वर्षांच्या असल्याचे समजते. या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 तसेच POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. अल्पवयीन मुलींना अशा गुन्हेगारी जाळ्यात ओढणाऱ्यांविरुद्ध कायद्याने अत्यंत कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संपूर्ण रॅकेट उघड करणे आणि अशा प्रकारांना कायमस्वरूपी आळा बसवणे गरजेचे आहे.समाजानेही सतर्क राहून संशयास्पद हालचालींची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.गुन्हे शाखेची ही कारवाई कौतुकास्पद असली तरी या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
0 Comments