प्रतिनिधी (पनवेल):देविचापाडा येथील आदर्श एज्युकेशन सोसायटीचे आयडियल पब्लिक स्कूल येथे शुक्रवार, दि. ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन ॲड. विवेक परशुराम भोपी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना विवेक भोपी यांनी सांगितले की, जरी ते या शाळेचे थेट विद्यार्थी नसले तरी त्यांचे मार्गदर्शक काठे सर व म्हात्रे सर हे शाळेचे माजी विद्यार्थी असल्याने शाळेशी आपला भावनिक जिव्हाळा आहे. अशा कार्यक्रमात उद्घाटक म्हणून सहभागी होण्याचा सन्मान मिळणे ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून राम महादू पाटील, योगिता समीर फडके, अरविंद पुंडलिक म्हात्रे, अरुणा किरण दर्पणे, अर्चना योगेश मोहिते, विलास देवराम पवार, प्रवरेश विठ्ठल तांबे, जमीर शेख, गोरक्षनाथ पाटील तसेच भगवान पाटील यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, नाट्य, गीत व विविध कलागुणांनी उपस्थितांची मने जिंकली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो व त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे संचालक मंडळ, प्राचार्य, शिक्षकवृंद, कर्मचारी व पालकांचे आभार मानण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
0 Comments