गुळसुंदे ग्रामपंचायतीत संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी

पनवेल (प्रतिनिधी): तालुक्यातील गुळसुंदे ग्रामपंचायत कार्यालयात थोर समाजसुधारक, संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती आज (दि. ०१ फेब्रुवारी)मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व अभिवादनाने करण्यात आली.कार्यक्रमप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी संत रोहिदास महाराज यांच्या जीवनकार्यावर सखोल मार्गदर्शन केले. समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि मानवतावादी विचारांचा प्रसार करण्याचे कार्य संत रोहिदास महाराज यांनी आपल्या आयुष्यातून केले. समाजातील जातीभेद, विषमता व अन्याय दूर करून सर्वांना समानतेची व सन्मानाची वागणूक मिळावी, हा त्यांचा संदेश आजच्या काळात अधिकच महत्त्वाचा असल्याचे मत माजी सरपंच आर. डी. पाटील यांनी व्यक्त केले. त्यांच्या विचारांचा स्वीकार करून सामाजिक सलोखा जपण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
या जयंती कार्यक्रमास गुळसुंदे ग्रामपंचायतीच्या सरपंच मिनाक्षी जगताप, ग्रामपंचायत सदस्य सतिश साठे, सदस्या अपर्णा चौलकर, ताई गायकवाड, सामाजिक कार्यकर्ता चिंतामण कडवे यांच्यासह राजेश साठे, अंकुश साठे, विनायक पाटील, सुनील पालकर, अशोक गायकवाड, संतोष चौलकर, योगेश साठे, स्वप्निल चौलकर, सचिन गायकवाड, आतिष पाटील, संकेत चौलकर, समाधान गायकवाड, सुशीला गरुडे, अनिता गायकवाड, सखुबाई साठे, नंदा चौलकर, शोभा गायकवाड, ज्योती कडवे, स्वाती गायकवाड, ऋतुजा कडवे, नमिता कडवे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संत रोहिदास महाराज यांचे विचार समाजात रुजवण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने होणे आवश्यक असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments