(नवीन पनवेल) : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त) यांच्या इंग्रजी विभागातर्फे संस्थेचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या ७५व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दोन दिवसीय आंतरमहाविद्यालयीन निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या स्पर्धांचा प्रारंभ ३० जानेवारी २०२६ रोजी निबंध लेखन स्पर्धेने झाला, तर ३१ जानेवारी २०२६ रोजी वक्तृत्व स्पर्धा पार पडली. विद्यार्थ्यांची वैचारिक क्षमता वाढविणे, अभिव्यक्ती कौशल्य विकसित करणे तसेच सृजनशीलतेला चालना देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये महात्मा फुले आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, रामशेठ ठाकूर कॉलेज, खारघर, भागुबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉ तसेच के. बी. पी. कॉलेज, वाशी येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. निबंध लेखन स्पर्धेत १७० विद्यार्थ्यांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
स्पर्धांचे निष्पक्ष व गुणवत्तापूर्ण मूल्यमापन करण्यासाठी बाह्य परीक्षक म्हणून प्रा. विशाल बोडले (एस.आय.ई.एस. कॉलेज, नेरूळ), डॉ. रमेश यादव, प्रा. दुर्गादेवी मौर्या (रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय, खारघर), डॉ. राम भीसे (एस.आय.ई.एस. ग्रॅज्युएट स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी) आणि डॉ. दीप्ती मंडलिक (अॅमिटी युनिव्हर्सिटी, मुंबई) यांनी काम पाहिले. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे, चषक व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांकास रु. ५,०००/-, द्वितीय क्रमांकास रु. ४,०००/- व तृतीय क्रमांकास रु. ३,०००/- अशी रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली.
निबंध लेखन स्पर्धेचे विजेते :
प्रथम – प्रीती अरुण थोरात (प्रथम वर्ष विज्ञान)
द्वितीय – स्नेहा अस्त चौधरी (तृतीय वर्ष विज्ञान)
तृतीय – नुरुन्निहार मोहम्मद नजीम उद्दीन (प्रथम वर्ष कला)
वक्तृत्व स्पर्धेचे विजेते :
प्रथम – प्रिया शेषनाथ चौधरी (पदव्युत्तर विज्ञान – भाग २)
द्वितीय – जान्हवी भास्कर हातमोडे (पदव्युत्तर कला – भाग १)
तृतीय – साशा वायगंणकर (तृतीय वर्ष विज्ञान)
पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य अॅड. राहुल घरत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजी विभागप्रमुख डॉ. आर. व्ही. येवले यांनी केले. प्रमुख अतिथी अॅड. राहुल घरत यांनी विजेत्यांचे अभिनंदन करत अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व व्यक्तिमत्त्व विकास घडतो, असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) एस. के. पाटील यांनी अभिव्यक्ती कौशल्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. के. एन. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. आर. के. पाटील यांनी मानले. या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य प्रो. (डॉ.) एस. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी विभागप्रमुख डॉ. आर. व्ही. येवले तसेच इंग्रजी विभागातील प्राध्यापक डॉ. एस. एन. परकाळे, प्रा. आर. के. पाटील, प्रा. के. एन. पाटील, प्रा. अम्मू उन्निकृष्णन व प्रा. एम. पी. पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments