प्रतिनिधी/पनवेल : सकळ मराठा समाज पनवेल कमिटीच्या वतीने पनवेलचे तहसीलदार जितेंद्र इंगळे यांची भेट घेऊन कुणबी दाखल्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या भेटीत उसर्ली गावात कुणबी नोंद सापडल्याची माहिती तहसीलदारांना देण्यात आली. कमिटीने संबंधितांना लवकरात लवकर कुणबी दाखले वितरित करण्याची मागणी केली, जेणेकरून गावातील नागरिकांना त्यांच्या जमिनीवरील अधिकार मिळविण्यात अडथळा येऊ नये.या प्रसंगी शिवसेना उरण विधानसभा उपजिल्हाप्रमुख विनोद साबळे, तसेच दिनेश मांडवकर, विकास वारदे, सचिन भगत, राजू भगत, पराग मोहिते, विनायक चोरगे आणि दीपक पाटील उपस्थित होते. कमिटीने तहसीलदारांशी चर्चा करताना गावातील नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची आणि त्यावर त्वरित उपाययोजना करण्याची विनंती केली.सकाळ मराठा समाज पनवेल कमिटीच्या या पुढाकारामुळे उसर्ली गावातील नागरिकांना त्यांच्या हक्कांसाठी प्रशासनाकडून लवकर मदत मिळण्याची अपेक्षा आहे.
0 Comments