प्रतिनिधी /पनवेल : खारघर येथे ई.एफ. ट्रस्टतर्फे आयोजित दुर्गापूजा २०२५ मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने संपन्न झाली. सलग दुसऱ्या वर्षी आयोजित या उत्सवाला परिसरातील नागरिक व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पूजेची शोभा वाढवली. शष्ठीपासून विजया दशमीपर्यंत पाच दिवस देवी दुर्गेच्या विविध पूजा ,अर्चना, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन-कीर्तन आणि पारंपरिक नृत्यांनी वातावरण भक्तिमय झाले. महाअष्टमी व महानवमीच्या दिवशी विशेष पूजेला मोठी गर्दी जमली. विजया दशमीच्या दिवशी झालेला सिंदूर खेळा आणि मूर्ती विसर्जन सोहळा भव्यतेने पार पडला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेले डॉ. शिल्पा पाठक ठाकूर यांचे नेतृत्व व त्यांच्या संपूर्ण परिवारातील पती अभिनव ठाकूर, मुलगा एत्तान ठाकूर,भाऊ चेतन, डॉ. प्रीती , आई निशा पाठक यांचा संपूर्ण परिवाराचा सक्रिय सहभाग उल्लेखनीय राहिला. यांनी पूजेपासून भक्तांच्या स्वागतापर्यंत प्रत्येक टप्प्यात मनापासून सहभाग घेतला. त्यांच्या योगदानामुळे संपूर्ण उत्सवाला एक वेगळीच रंगत प्राप्त झाली. पूर्ण आयोजन यशस्वी पार पाडण्यासाठी ई.एफ. ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेतली.
सजावट, प्रसादाची व्यवस्था, सांस्कृतिक कार्यक्रम, पाहुण्यांचे स्वागत या सर्व बाबींचे उत्तम नियोजन केले. त्यांच्या मेहनतीमुळे उत्सवाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व आकर्षक ठरले. या सोहळ्याला अनेक कार्यकर्त्यांनी तसेच मान्यवरांनी भेट दिली. कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. या प्रसंगी मा .आमदार बाळाराम पाटील, कामगार नेत्या श्रुती म्हात्रे, माजी नगरसेवक हरेश केणी व त्यांच्या पत्नी प्रीती केणी, सुप्रिया, सुभाष चक्रभारती , कृष्णा प्रभुजी, शशिकला सिंग, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, महिला काँग्रेस अध्यक्षा ॲड.संध्या ताई,झीशान अहमद विश्वनाथ चौधरी, भारती चौधरी, मिनाक्षी ठाकुर, डॉ. पवन, वसिम खान, संदेश, कीर्ती आय. एस. एच फाउंडेशन , युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे, ऍड. प्रितेश साहू, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, कॅप्टन कलावत, डॉ. स्वप्निल पवार, लतिफ नालखंदे, राकेश चौहान, सोनिया, अभिजीत, भाजप नेते सुशील शहा, कॉलनी फोरम अध्यक्ष मा. नगरसेविका लीना गरड, मधू पाटील, तसेच अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने उत्सवाची शोभा आणखी वाढली.
0 Comments