पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या वतीने संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त ग्राम स्वच्छता अभियानचा शुभारंभ (दि. ०६ ) रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जन्म गावापासून अर्थात न्हावाखाडी येथून सुरू झाला. सर्व प्रथम म्हसेश्वर मंदिरात विद्यार्थ्यांच्या प्रार्थना व स्वागत गीताने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी न्हावेखाडी ग्रामपंचायत सरपंच विजेंद्र पाटील, माजी उपसरपंच जितेंद्र म्हात्रे, म्हसेश्वर मंदिर अध्यक्ष सी.एल.ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य सागर ठाकूर, नरेश मोकल ,प्रकाश कडू, मीनाक्षी पाटील ,रंजना पाटील, ललिता ठाकूर, सुनिता भोईर, सदाशिव ठाकूर ,सुरेश ठाकूर, वैभव म्हात्रे ,राजेश ठाकूर अशोक मोकल, सिकेटी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रशांत मोरे, मराठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर, पर्यवेक्षक अजित सोनवणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या ३१ विद्यार्थिनी व १६ विद्यार्थी स्वयंसेवकांनी न्हावाखाडी परिसरात तसेच रायगड जिल्हा परिषद मॉन्टेसरी व प्राथमिक शाळेत साफसफाई करण्याचे काम केले . सर्व विद्यार्थ्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जन्मघरास भेट दिली तसेच त्यांच्या जन्मघराविषयी व त्यांच्या प्राथमिक शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. दुपार सत्रात लोकनेते रामशेठ ठाकूर व संस्थेचे उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख यांनी राष्ट्रीय सेवा योजना ग्राम स्वच्छता अभियानाला भेट दिली. यावेळी कार्यक्रम अधिकारी निखिलेश देशमुख यांनी प्रास्ताविकातून राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश कथन केला आणि साहेबांच्या कार्याची थोरवी मांडली. सदर कार्यक्रमात दिशा बोरसे ( बारावी कला) व स्नेहा शिंदे(माजी विद्यार्थिनी) यांनी आजच्या ग्राम स्वच्छता अभियानाचे कार्य व महत्त्व स्पष्ट केले. स्नेहा शिंदे या विद्यार्थिनीने आपल्या मनोगत आतून विद्यार्थ्यांना चांगले कार्य करण्याची प्रेरणा दिली. प्राचार्य प्रशांत मोरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन तिचा सन्मान करण्यात आला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कुठलेही सामाजिक कार्य करताना संघटन शक्ती व एकीचे बळ किती महत्त्वाचे असते हे उदाहरणाद्वारे स्पष्ट केले. प्रत्येक विद्यार्थ्याने या सामाजिक कार्यात सहभागी झाले पाहिजे, निरंतर अभ्यास केला पाहिजे व समाजाला काही ना काही देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख यांनी राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे काय? विद्यार्थ्यांनी कसे काम केले पाहिजे ?आणि रामबागची निर्मिती कशी केली ? याचे सोप्या शब्दात विवेचन केले . या कार्यक्रमात न्हावेखाडी विभागातील जनार्दन ठाकूर, मंजुळा म्हात्रे, जानुबाई ठाकूर, बाबीबाई म्हात्रे, या स्वच्छता दूतांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.सदर कार्यक्रम दोन टप्प्यांत झाला असल्याने पूर्वार्धात सहशिक्षिका उजमा कच्छी यांनी तर उत्तरार्धात प्राचार्य प्रशांत मोरे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
0 Comments