नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची व फेऱ्या वाढवण्याची मागणी — प्रवाशांच्या हितासाठी प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा; रेल्वे प्रशासनाकडून लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित

प्रतिनिधी / उरण :उरण परिसरातील प्रवाशांना दररोज होणाऱ्या प्रचंड गर्दी व असुविधेच्या पार्श्वभूमीवर नेरुळ–उरण लोकल गाड्यांची क्षमता वाढवावी, अशी मागणी पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) यांना या संदर्भात स्मरणपत्र देण्यात आले. या मागणीत सध्या धावणाऱ्या ९ डब्यांच्या लोकल गाड्या १२ डब्यांच्या करण्याची आणि या मार्गावरील फेऱ्यांची संख्या वाढविण्याची विनंती करण्यात आली आहे.याच विषयावर यापूर्वीही २७ नोव्हेंबर २०२४ रोजी लेखी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा झाल्या, मात्र अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने प्रवाशांनी ही मागणी पुन्हा नव्याने केली आहे.दररोज प्रवास करणारे शाळकरी विद्यार्थी, महिला आणि नोकरदार वर्ग यांना गर्दीमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतो. वाढत्या प्रवासीसंख्येमुळे सध्या धावणाऱ्या ९ डब्यांच्या लोकल अपुऱ्या पडत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या आणि सोयीच्या दृष्टीने ही मागणी तातडीने मान्य करावी, असे स्मरणपत्रात नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments