खारघर – छठपूजेचा पवित्र आणि पारंपरिक उत्सव खारघरमध्ये एकतान फाउंडेशनच्या वतीने अत्यंत भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण परिसर आकर्षक सजावट, सुंदर पंडाल आणि भक्ति-भावनेने ओथंबलेल्या वातावरणाने उजळून निघाला होता.महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सजून सूर्यदेव आणि छठी माईची पूजा केली. सूर्यास्ताच्या वेळी संध्याअर्घ्य आणि सूर्योदयाच्या वेळी प्रातःअर्घ्य अर्पण करून पूजा विधींचा समारोप करण्यात आला. संपूर्ण वातावरण “छठ माई की जय” या जयघोषांनी दुमदुमले.या प्रसंगी काँग्रेस पनवेल शहराच्या जनरल सेक्रेटरी डॉ. शिल्पा पाठक ठाकूर यांनी उपस्थित भाविकांना संबोधित करताना म्हटले, छठपूजा ही केवळ पूजा नाही, तर सूर्य आणि पृथ्वीप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पर्व आहे.
हा सण आपल्याला निसर्गाशी प्रेमाने आणि आदराने वागायला शिकवतो.त्यांनी पुढे सांगितले की, समाजातील प्रत्येकाने वृक्षारोपण आणि जलसंवर्धन यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, कारण निसर्ग संवर्धन हेच खरे धर्म आहे. डॉ. ठाकूर यांनी एत्त्तान फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत सांगितले की अशा उपक्रमांमुळे समाजात संस्कृती, श्रद्धा आणि पर्यावरण जागरूकतेचा संगम घडतो.एत्त्तान फाउंडेशनच्या या सुंदर आयोजनाने समाजात भक्ति, संस्कृती आणि पर्यावरणप्रेमाचा सुंदर संदेश दिला.या वेळी सुजित पांडे, रोशन राय, अमन मिश्रा, नारद साहू, नारायण साहू यांच्यासह अनेक मान्यवर, नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.छठपूजेच्या निमित्ताने झालेल्या या भव्य कार्यक्रमाने खारघर परिसरात आस्था आणि एकतेचा दीप प्रज्वलित केला.
0 Comments