पनवेल (प्रतिनिधी) खारघर शहरातील सेक्टर १४ येथील तलावाजवळ भारतीय जनता पक्षाच्या खारघर मंडलाच्या वतीने छठपूजेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या धार्मिक सोहळ्याला पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.छठ पूजा हा उत्तर भारतातील एक अत्यंत प्राचीन व पवित्र सण आहे. ही पूजा प्रामुख्याने सूर्यदेव आणि छठमातेच्या आराधनेसाठी केली जाते. सूर्यदेवाला ऊर्जा व आरोग्याचा अधिष्ठाता देव मानले जाते. या दिवशी उपासक उपवास धरून नदी, तलाव किंवा जलाशयाच्या किनारी उभे राहून उदयास्त सूर्याला अर्घ्य अर्पण करतात. हा सण निसर्ग, शुद्धता आणि शिस्तीचा प्रतीक मानला जातो. छठमातेच्या आराधनेनंतर मंडळाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रसादाचे वाटप करण्यात आले. टेकवा प्रसाद, केळी आणि विविध फळांचा समावेश असलेला हा प्रसाद श्रद्धाळूना देण्यात आला.
या प्रसंगी खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, जिल्हा सचिव ब्रीजेश पटेल, उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष संतोष शर्मा, माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय, माजी नगरसेवक नरेश ठाकूर, समीर कदम, युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील, अमर उपाध्याय, उपाध्यक्ष प्रवीण बेरा, आदित्य हातगे, दीपक ठाकूर, हार्दिक पटेल, मयूर घरत, पप्पू खामकर आणि सिद्धेश खेडकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या सोहळ्यात परिसरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत छठमातेची पूजा-अर्चना केली.
0 Comments