पनवेल (प्रतिनिधी) रायगड जिल्ह्यासह पनवेल, उरण आणि इतर विभागाचा चेहरामोहरा विकासाच्या माध्यमातून बदलण्याचे कार्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले असून, रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे गौरवोद्गार खासदार निलेश लंके यांनी काढले. खासदार निलेश लंके यांनी मंगळवारी पनवेल येथे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये सामाजिक, शैक्षणिक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी खासदार निलेश लंके यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या समाजकार्यातील योगदानाचा उल्लेख करत त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले.
0 Comments