पनवेल : भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपा नेते ऍड. आस्वाद पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी रविंद्र चव्हाण यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि यशस्वी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, कार्यकर्त्यांमध्येही आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
0 Comments